नमस्कार!…
‘जिज्ञासा मंथन’ (Jigyasa Manthan) वर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे.
जिज्ञासा मंथन हे विविध विषयांमागची माहिती, इतिहास, कारणे आणि रंजक तथ्ये सोप्या व समजण्यासारख्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात, समाजात आणि जगाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पाहतो, ऐकतो किंवा अनुभवतो; पण त्यामागचे “का?”, “कसे?” आणि “कधी?” जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्या मनात असते.
याच जिज्ञासेला ज्ञानाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न म्हणजे जिज्ञासा मंथन.
येथे तुम्हाला माहितीपूर्ण लेख, इतिहास व परंपरा, सण-उत्सव, विज्ञान व रहस्य, पौराणिक व सांस्कृतिक विषय, खेळ आणि खेळाडूंची माहिती, सुंदर Images, शुभेच्छा संदेश तसेच वाचकांच्या जिज्ञासेला चालना देणारे विविध विषय वाचायला मिळतील.
एखाद्या विषयाची केवळ वरवरची माहिती देण्याऐवजी, शक्य तिथे त्याची पार्श्वभूमी, इतिहास, संदर्भ, वैज्ञानिक दृष्टिकोन, सांस्कृतिक महत्त्व आणि विविध पैलू वाचकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो.
परंपरा, संस्कृती आणि श्रद्धांचा आदर राखतानाच जिथे शक्य असेल तिथे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विषय समजून घेण्याचाही प्रयत्न केला जातो.
जिज्ञासा मंथन ही सतत विकसित होत जाणारी वेबसाईट आहे. भविष्यात वाचकांना उपयुक्त आणि मनोरंजक वाटतील असे नवीन विषय आणि content आम्ही जोडत राहू.
आमचा उद्देश लोकांच्या मनात नवीन प्रश्न निर्माण करणे, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासा वाढवणे आणि प्रत्येक भेटीत वाचकाला काहीतरी नवीन जाणून घेण्याची संधी देणे हा आहे.
जिज्ञासा जिवंत ठेवा.
जिज्ञासा मंथन — प्रश्नांपासून ज्ञानाच्या प्रवासापर्यंत.
आमच्याशी संपर्क साधा:
ई-मेल: contact@jigyasamanthan.in
वेबसाइट: https://jigyasamanthan.in